Amit Shah : बिहारमध्ये ‘अबकी बार 160 पार’! शाह यांचा नारा ठरला खरा, NDA बहुमताच्या दिशेने

Amit Shah On Bihar Election : नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार? तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला मोठा झटका
ANI :- बिहार विधानसभा निवडणुकीच्या Bihar Election मतमोजणीच्या ताज्या कलांनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला ‘अबकी बार 160 पार’ हा नारा खरा ठरताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 160 हून अधिक जागांवर आघाडीवर असून, राज्यात पुन्हा एकदा NDA ची सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. Bihar Election Latest News
सध्याच्या कलांमध्ये NDA मध्ये समाविष्ट असलेले पक्ष मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत:
भाजप (BJP): 68 जागांवर आघाडी
जेडीयू (JDU): 65 जागांवर आघाडी
एलजेपी (LJP): 16 जागांवर आघाडी
हम (HAM): 04 जागांवर आघाडी
या निवडणुकीतील मुख्य लढत महागठबंधन आणि NDA यांच्यात होती. मात्र, ताजे कल पाहता एकट्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू पक्षानेच महागठबंधनवर मोठी आघाडी घेतली आहे. नितीश यांची जेडीयू एकट्याने 70 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन 57 जागांवर पिछाडीवर आहे.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी बहुमत मिळवण्यासाठी 122 जागांचा आकडा आवश्यक आहे. ताज्या कलांनुसार, NDA बहुमताचा आकडा सहज पार करताना दिसत आहे, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री बनू शकतात आणि तेजस्वी यादव यांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न तुटताना दिसत आहे.
बिहारमध्ये 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले होते. आता मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात NDA हा आकडा कायम राखते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



