मुंबई

Kharghar Fire : खारघरच्या ट्रायसिटी इमारतीला भीषण आग; 10 ते 14 व्या मजल्यावर हाहाकार

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; चार रहिवाशांना श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

खारघर (नवी मुंबई) :- खारघर उपनगरातील सेक्टर 34 मध्ये असलेल्या ट्रायसिटी इमारतीमध्ये रविवारी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी इमारतीच्या 10 व्या मजल्यापासून ते 14 व्या मजल्यापर्यंत ही आग पसरली.

धुरामुळे चार जण जखमी

वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागताच खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ मदतकार्य हाती घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, धुरामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास झाल्याने चार रहिवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सुमन कुमारी नीरज भारद्वाज (31 वय), वाणीच नीरज भारद्वाज (9 वय), तेजस्वी राजेश कुमार सिंग (19 वय) आणि यशस्वी राजेश कुमार सिंग (16 वय) यांचा समावेश आहे. सर्वांना खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य हाती घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या आग कशामुळे लागली याचा पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0