Thane Crime News : ठाण्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, 3 तरुणीची सुटका

•दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.
ठाणे :- शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाई करत दलाल महिलेस अटक व तीन महिलेची सुटका केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी हॉटेल विश्वास टीप टॉप स्वीट्स दुकान जवळ ठाणे स्टेशन रोड या ठिकाणी एक महिला वेश्या व्यवसायासाठी दोन पिडीत महिलांना घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दलाल महिला अटक केली.
वेश्या व्यवसायाबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करण्याचे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. दोन पंचांना सोबत घेत व एक बोगस ग्राहक तयार करत त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्याने दलाल महिलेला भेटल्यानंतर तिने महिला दाखवली.बोगस ग्राहक गेल्यानंतर त्याने पोलिसांनी सापळा रचून वेश्या दलाल महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच तिच्या ताब्यातून पोलिसांनी तीन पिडीत महिलांचे सुटका केली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात अनैतिक व्यापार अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, धनाजी क्षिरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वालगुडे, पोलीस हवालदार सुवारे, महिला पोलीस अंमलदार खरात, हर्षदा थोरात, किरण चांदेकर, पोलीस अंमलदार यादव, पोलीस शिपाई घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.


