Patrachal Redevelopment Scam : कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने,प्रवीण राऊत यांची 74 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त
Ed Seized Pravin Raut Property : संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची 74 कोटी रुपयांची आणखी प्रॉपर्टी जप्त, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ करत संजयराव त्यांच्यावर केली टीका
मुंबई :- कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी Patrachal Redevelopment Scam ईडीने ED आणखी एक कारवाई केली आहे. या प्रकरणात संजय राऊत Sanjay Raut यांचे पार्टनर प्रवीण राऊत Pravin Raut यांची 74 कोटी रुपयांची आणखी प्रॉपर्टी जप्त करण्यात आली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या Kirit Somiya यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी Social Media सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांना हिशोब तर द्यावाच लागेल, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. Kirit Somiya On Patrachal Redevelopment Scam
मुंबईतील पत्रा चाळ घोटाळा राज्यात सध्या चांगलाच चर्चेत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणी ईडीच्या वतीने आणखी कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. Kirit Somiya On Patrachal Redevelopment Scam
नेमके काय म्हणाले किरीट सोमय्या?
ईडीने संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची गोरेगाव पत्रा चाळ घोटाळ्यातील 74 कोटी रुपयांची आणखी एक प्रॉपर्टी जप्त केली आहे. पीएमसी बँकेचे 95 कोटी रुपये पत्रा चाळ एसआरए द्वारे प्रवीण राऊत यांनी स्वतःच्या व्यक्तिगत खात्यात वळवले. त्यातील कोट्यावधी रुपये संजय राऊत यांच्या खात्यात वळविण्यात आले, असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे उत्तर तर द्यावेच लागेल, असे आवाहन देखील संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांनी दिले आहे.