Mira Road Rape News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा “त्या” नराधमाला दहा वर्षाचा तुरुंगवास

Mira Road Rape News : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला न्यायालयाकडून मोठी शिक्षा, दहा वर्षाचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांचा दंड
मिरा रोड :- अक्षय शिंदे याने बदलापूर Akshay Shinde Badlapur Case येथील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या कारवाईत त्याला एन्काऊंटर करण्यात आले आहे. हे प्रकरण ताजे असताना आता पोलिसांकडून आणि न्यायालयाकडून पोक्सो अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अधिकाधिक शिक्षा होण्याकरिता प्रशासनाकडून ठोस पुरावे सादर केले जात आहे. अशाच एका प्रकरणातील अल्पवयीन मुलींचे वेळोवेळी बलात्कार करून तिला गरोदर केले आणि त्यानंतर तिचे गर्भपात करणारा एका नराधमाला न्यायालयाने दहा वर्षाचा तुरुंगवास तसेच पाच हजार रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावलेला आहे. Mira Road Rape News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 02 मे 2016 रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात केल्या बाबतचे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादवि कलम 376 (2),(एन),328 सह पोक्सो कलम 4,6 आणि 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा प्राथमिक तपास तात्काळीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे आणि पोलीस निरीक्षक धनाजी कळंत्रे यांनी सुरू केला होता. विशेष सत्र न्यायालय, ठाणे यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने या नराधमाला शिक्षा सुनावली आहे. आरोपीला 10 वर्ष तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांचा दंड तसेच तो दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावास असे शिक्षा सुनावली आहे. Mira Road Rape News
न्यायालयात सुनावणी चालु असताना प्रकाश गायकवाड, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 मिरारोड विभाग,विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, काशिमीरा पोलीस ठाणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.तपासिक अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे,पोलीस निरीक्षक धनाजी कळंत्रे यांनी, कोर्ट डयुटी अंमलदार म्हणुन पोलीस शिपाई साईदास चव्हाण, वअनिल मढवी यांनी आणि समन्स बजावणी डयुटी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार सचिन बर्डे यांनी कामकाज पाहीले. Mira Road Rape News