क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Ahmedabad Express News : मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; नायगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला आरोपींचा पाठलाग

Mumbai Ahmedabad Express Robbery Case : ‘गुगल पे’चा पासवर्ड घेऊन पसार होणाऱ्या लुटारूंना 24 तासांत बेड्या; कारसह 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

वसई/नायगाव | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना गाठून, मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नायगाव पोलिसांनी Naygaon Police News पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुटलेले मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. Mumbai Latest Crime News

नेमकी घटना काय?

21 डिसेंबर 2825 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी हे ससूनवघर येथील ब्रिजजवळून पायी जात होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या ‘मारुती सुझुकी एसप्रेसो’ कारमधून आलेल्या तिघांनी त्यांना गाडीत खेचले. “पैसे आणि मोबाईल काढ, नाहीतर जिवंत मारून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही, तर आरोपींनी फिर्यादीला घाबरवून त्यांच्या मोबाईलमधील ‘गुगल पे’चा (Google Pay) पासवर्डही जबरदस्तीने घेतला आणि त्यांना रस्त्यात सोडून पळ काढला.

नायगाव पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाची दोन विशेष पथके तयार केली. फिर्यादीने दिलेल्या अपूर्ण गाडी क्रमांकाच्या (MH-….-9363) आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांचे जाळे पसरवले. अखेर नायगाव पूर्व येथील सोमेश्वर नगर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल

1) वसीउल्ला सलीम खान (वय 22, रा. सोमेश्वर नगर, नायगाव)

2) रणजीत संदीप जैस्वाल (वय 19 , रा. नायगाव पूर्व) तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस कारवाईत जप्त करण्यात आलेली मालमत्ता

31 हजार 700 रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम.

5 लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एसप्रेसो कार.

या पथकाने बजावली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आणि इतर अंमलदारांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0