मुंबई

Rohit Pawar : बळी घ्यायचाच निर्णय घेतलाय का सरकारनं? – रोहित पवारांचा संतप्त सवाल

• उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, पण ECG मशीन बंद!

मुंबई | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असतानाही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप करत विचारलं आहे की, “या सरकारला आंदोलकांचा बळी घ्यायचाच आहे का?”

बच्चू कडूंच्या आंदोलनावरून सरकार, विरोधक आणि समविचारी गटांमध्ये टोकाचा संघर्ष

पवार यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत सांगितले की, “प्रखर उन्हात सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकांची प्रकृती ढासळली असताना उपचारासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे साधे ECG मशीनही चालू नव्हते. ही अतिशय गंभीर बाब असून सरकार डोळे झाकून आणि कानावर हात ठेवून बसले आहे.”

दरम्यान, उपोषणाला प्रसिद्धीचे आंदोलन म्हणणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांवरही टीकेची झोड उठली आहे. विखे पाटील यांच्या “प्रसिद्धीसाठी उपोषण” या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. “जर बच्चू कडूंचं आंदोलन प्रसिद्धीसाठी असेल, तर मग लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंनाही कर्जमुक्तीसाठी उपोषणाला बसवा, शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा राहील,” असा टोला शेट्टी यांनी हाणला.संपूर्ण आंदोलन अधिकच तापलं असून, सरकारच्या संवेदनशून्य भूमिकेवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकींचं रणकंदन सुरू झालं आहे. आता सरकार या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेते का, की आणखी बळीची वाट पाहते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0