
Kalyan Crime News : कल्याण शहर वाहतूक उपशाखा कक्षातील पोलीस हवालदार प्रवीण गोपाळे यांना पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहाथ पकडले आहे
कल्याण :- कल्याणमध्ये माल वाहतूकी दरम्यान कोठेही न अडवण्याकरीता चालकाकडून पाचशे रुपयांची लाच घेताना महात्मा फुले पोलीस ठाणे Mahtma Phule Police Station अंतर्गत येणाऱ्या शहर वाहतूक विभागाच्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) पकडले. प्रविण गुलाब गोपाळे (41 वय) असे पोलीस हवालदार यांचे नाव असून सध्या ते शहाड पोलीस चौकीच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. Kalyan ACB Trap News
या प्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यानुसार, महात्मा फुले पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून त्यांचा महींद्रा बोलेरो पिकअप टेम्पो या वाहनास कल्याणमध्ये माल वाहतूकी दरम्यान कोठेही न अडवण्या करीता दर महीना 700 रुपये ची कल्याण वाहतूक विभागातील शहाड वाहतूक चौकीतील पोलीस हवालदार प्रविण गोपाळे यांनी मागणी केली होती. पैसे दिले नाही तर प्रत्येक चौकात गाडी अडवून कारवाई करणार असल्याबाबत सांगीतले होते. अशा आशयाची तक्रार तक्रारदार यांनी दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे येथे दिलेली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 4 फेब्रुवारी 25 रोजी पडताळणी केली असता पोलीस हवालदार प्रविण गुलाब गोपाळे, यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 500 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्या आहेत. एसीबी ठाणे यांनी काल (11 फेब्रुवारी ) रोजी सापळा रचून कारवाई केली असता पोलीस हवालदार प्रविण गोपाळे, यांना तक्रारदार यांच्याकडुन शहाड वाहतूक चौकीमध्ये 500 रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस हवालदार यांना ताब्यात घेण्यात आले असून राजेश जागडे, पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे पुढील तपास करत आहे.