Team India Cricket: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर!

Team India Cricket Latest Update : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025आधी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. बुमराह अद्याप त्याच्या पाठीच्या समस्येतून पूर्णपणे बरा झालेला नाही, ज्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग बनू शकणार नाही.
BCCI : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025पूर्वीChampion Trophy टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह Jasprith Bhumrah या टूर्नामेंटमध्ये खेळू शकेल की नाही याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात सप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.त्याच वेळी, बुमराह अलीकडेच त्याच्या पाठीचे स्कॅन करण्यासाठी बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गेला होता. पण भारताचा हा मोठा मॅच विनर सध्या मैदानात परतणार नाहीये.
, जसप्रीत बुमराह अद्याप त्याच्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही, ज्यामुळे तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. बेंगळुरूमध्ये बुमराहच्या स्कॅनमध्ये काहीही असामान्य आढळले नसले तरी तो अद्याप गोलंदाजीसाठी पूर्णपणे तयार नाही.तो काही आठवड्यांत धावण्यास सुरुवात करेल आणि नंतर हळूहळू गोलंदाजी सुरू करेल अशी शक्यता आहे. तोपर्यंत बीसीसीआयचे वैद्यकीय पथक बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल.
18 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 जणांच्या संघात बुमराहचा समावेश करण्यात आला होता. पण आता बीसीसीआयला टीम इंडियात बदल करावे लागले आहेत.बुमराहच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे, ज्याचा इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत बुमराहचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला होता. या मालिकेदरम्यान हर्षित राणानेही वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिंग शमी, , अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
रिजर्व :- यशस्वी जायसवाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे.