ShivSena Eknath Shinde : कल्याणच्या शिल्लेदाराने उद्धव ठाकरे यांचे साथ सोडली, जिल्हाप्रमुख आले केला शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
Chandrakant Borade Join Shinde Group : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत कल्याणमध्ये गेले. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बोराडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते. Chandrakant Borade Join Shinde Group
चंद्रकांत बोराडे यांच्यावर शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दबाब होता, अशीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांची कल्याण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली होती. उल्हासनगर येथे पप्पु कलानी यांचा दबदबा असताना त्यांनी शिवसेना वाढविण्याचे काम केले. मराठी सिंधी समाजात वाद निर्माण झाल्यानंतर मराठी माणसांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची काम त्यांनी केले. त्यांची पत्नी शीतल बोराडे, आणि भाऊ नगर धनंजय हे नगरसेवक होते. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांचे कुटुंबिय उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. Chandrakant Borade Join Shinde Group
कल्याण लोकसभा मतदार संघावर शिंदे गटाचे वर्चस्व होते. परंतु आता उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात आले. यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकच भक्कम झाली आहे. यामुळे श्रीकांत शिंदे यांना लोकसभेचा गड गाठणे अधिक सोपे झाले आहे तर उद्धव ठाकरे यांची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यांना निवडणुकीपूर्वी पुन्हा नव्याने जिल्हा प्रमुखाची नियुक्ती करावी लागणार आहे. Chandrakant Borade Join Shinde Group
कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण, डोंबिवली, उल्हानगर येथील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत बोराडे यांनी ठाकरेंची साथ सोडली असली तरी त्यांचे लहान बंधू आणि कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे हे शिवसेना ठाकरे गटातच राहणार आहेत. Chandrakant Borade Join Shinde Group