कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी: बेकायदेशीर शस्त्रधारक 22 वर्षीय युवक गजाआड.
Kalyan Latest Crime News : कल्याण गुन्हे शाखा घटक 3 यशस्वी कामगिरी :- बिनधास्त शस्त्रसज्ज गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांची धडाकेबाज कारवाई
कल्याण, 19 नोव्हेंबर – कल्याण गुन्हे शाखेने Kalyan Crime Beanch देशी बनावटीच्या पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह एका २२ वर्षीय युवकाला आज अटक केली. अटक युवकाचे नाव सुधीर रामनिवास ठाकुर असून तो उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील नगला जगमोहन गावचा रहिवासी आहे. ही कारवाई कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक 3 ने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, या कारवाईला उत्तेजन देण्यात आले. गोपनीय सूचनांनुसार, ठाकुर हा विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीच्या बावन चाळ, डोंबिवली पश्चिम येथे शस्त्र विक्रीसाठी येणार होता. पोलिसांनी या भागात एक सापळा रचून त्याला रंगेहात पकडले.
त्याच्याकडून पोलिसांनी 90 हजार किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि 4 हजार किंमतीचे चार जिंवत काडतुसे जप्त केली. हे शस्त्र आणि काडतुसे विनापरवाना असल्याचे समोर आले, जे भारतीय शस्त्र कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी माहिती दिली की, “ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची आहे. अशा प्रकारची कारवाई गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत करते.” आगामी कालावधीत, या गुन्ह्याचा तपास अधिक तपशीलवारपणे केला जाईल.
कल्याण पोलिसांची ही कारवाई नागरिकांमध्ये आश्वासन निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बेकायदेशीर शस्त्रांची विक्री आणि तस्करी हा केवळ कायद्याचा भंगच नव्हे तर आपल्या समाजाच्या सुरक्षिततेला धोका आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे गुन्हेगारी आणि अवैध शस्त्र व्यवहार यांना नियंत्रणात ठेवणे शक्य होते.