Kalyan Lottery News : उल्हासनगर,कल्याण-डोंबिवलीत ऑनलाईन विन गेम (Win Game) लॉटरीचा शिरकाव!

Kalyan Latest Online Lottery Fraud News : बेकायदा ॲपद्वारे लॉटरी माफियांकडून खेळणाऱ्यांची फसवणूक; कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडीत, सरकारच्या डोळ्यावर काळी फीत ; पोलिसावर ऑनलाईन भुरळ
कल्याण :- उद्योग व्यापार, औद्योगिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेल्या उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहराला सद्या ऑनलाईन लॉटरीचा शिरकाव झाला आहे. Kalyan Online Lottery Game काही लॉटरी माफियांनी स्वतःचा ॲप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा सुरू केला आहे. illegal Lottery Game In Kalyan या बदमाशांकडून एकीकडे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत. परंतु सरकारच्या ऑनलाईन बेकायदा धंद्यावर नजर असतानाही या ऑनलाईन लॉटरीसाठी सरकारने डोळ्यावर काळीफित बांधली असून पोलीस प्रशासनाला ऑनलाईन भुरळ घातल्याची पाहायला मिळत आहे. विन गेम (Win Game) नावाच्या लॉटरीने कल्याण उल्हासनगर डोंबिवली अशा परिसरात धुमाकळत झालेल्या असून शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणावर लॉटरी खेळली जात आहे. Kalyan Latest Crime News
तथापी लॉटरी जुगाराच्या आहारी गेलेल्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे कल्याण-डोंबिवलीत पसरत चाललेल्या ऑनलाईन लॉटरीच्या गोरख धंद्यांतून दिसून येते.
जवळपास कल्याण डोंबिवली उल्हासनगर परिसरात 50 पेक्षा अधिक यांचे लॉटरी सेंटर असून शिरसाट नावाच्या व्यक्तीचा या धंद्यावर वर्चस्व आहे .नागपूर येथील राजेश नावाच्या व्यक्तीकडून संपूर्ण सॉफ्टवेअर पाहिले जाते. तसेच शंकर अहुजा नावाच्या व्यक्तीकडून स्थानिक प्रशासकीय गुंडाना हाताशी धरून हा धंदा अतिशय जोरात आणि जोमात चालू असल्याचे विश्वासनीय सूत्राने माहिती दिली आहे. तन्ना नावाच्या व्यक्तीकडून संपूर्ण धंद्याबाबत लायसनिंग केली जाते. म्हणजेच लोकल भाई,पोलीस, वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना चिरीमिरी करता मॅनेज करून या धंद्यांना अभय दिले जाते असा प्रकार या विन गेम लॉटरीच्या माध्यमातून सध्या कल्याण आजूबाजूच्या परिसरात जोर धरत आहे.
ॲप तयार करून त्याद्वारे ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आहे. शासनाचे त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. ऑनलाईन सेंटरची पोलिस यंत्रणेसह शासनाच्या संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.याकडे गंभीर समस्येकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाया कराव्यात, बेकायदेशीरपणे नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन सेंटर्सवर कारवाया कराव्यात, अशी मागणी होत आहे.