Share Market Scam : शेअर मार्केट क्लास ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक
महिलेच्या आर्थिक फसवणूक, नऊ लाख वीस हजाराचे फसवणूक
कल्याण :- शेअर मार्केटच्या Share Market Scam नावाखाली एका महिलेचे नऊ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेला शेअर मार्केटच्या क्लासेसच्या ॲपद्वारे नऊ लाख वीस हजाराची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. Share Market Scam
फिर्यादी महिला, (48 वर्षे,) रा.रामबाग, कल्याण पश्चिम यांना अनोळखी मोबाईलधारक महिला व इसम यांनी व्हॉट्स ॲपमध्ये मॅसेज करून शेअर्स मार्केट क्लास जॉईन करण्यास सांगुन SMILE हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना सदर ॲपव्दारे शेअर्स मार्केटमध्ये Share Market पैसे गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून एकुण 9 लाख 20 हजार रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नाईक हे करीत आहेत. Share Market Scam