Kalyan Crime News : खडकपाडा पोलिसांची कारवाई, कल्याण मधील तडीपार आरोपीला केले अटक
•आरोपीला 18 महिन्यासाठी ठाणे जिल्ह्यासह पाच तालुक्यातून केले होते हद्दपार
कल्याण :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. पोलिसांनी यंदाचे निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. कल्याणच्या पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला खडकपाडा पोलिसांनी वाडेकर परिसरातून अटक केली आहे.
आरोपी विठ्ठल कृष्णा भोईर (52 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, कल्याण यांनी ठाणे, जिल्हासह कल्याण,मुरबाड, वंड, उल्हासनगर अंबरनाथ व शहापूर या तालुक्यातून हद्दीतुन 18 महिन्याच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 1 ऑक्टोंबर 2022 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 कल्याण यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वा. चे सुमारास, खडकपाडा पोलिसा ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी विठ्ठल भोईर यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.