मुंबई

पद्म पुरस्कारांचा तेजस्वी सोहळा! अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 68 प्रतिष्ठित व्यक्तींना नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान,मनोरंजन क्षेत्रातील अजित कुमार, अरिजीत सिंह, शेखर कपूर यांचाही गौरव

मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या भव्य सोहळ्यात देशातील 68 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडला असून, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वर्षी 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे 25 जानेवारी रोजी सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या नागरी सन्मानासाठी 139 प्रतिष्ठित व्यक्तींंची नावे जाहीर केली होती. त्यापैकी 68 जणांना पुरस्कार प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे अभिनय सम्राट आणि ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समृद्ध अभिनय कारकिर्दीला आणि मराठी चित्रपटसृष्टीस दिलेल्या मोलाच्या योगदानाला यामुळे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

कला क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांना जाहीर झालेले पद्म पुरस्कार

गायक पंकज उधास (मरणोत्तर)-पद्म भूषण

अभिनेते नंदमुरी बालकृष्ण- पद्मभूषण

अभिनेते अजित कुमार-पद्मभूषण

फिल्म निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर-पद्मभूषण

अभिनेता अनंत नाग- पद्माभूषण

अभिनेते अशोक लक्ष्मण सराफ- पद्मश्री
गायक अरिजीत सिंह- पद्मश्री

अभिनय प्रशिक्षक, थिएटर दिग्दर्शक बैरी गॉडफ्रे जॉन-पद्मश्री

गायिका जसपिंदर नरूला- पद्मश्री

गायक अश्विनी भिडे-देशपांडे- पद्मश्री

संगीतकार रिकी ज्ञान केज-पद्मश्री

लोकगायक भेरू सिंह चौहान- पद्मश्री

भक्ति गायक हरजिंदर सिंह श्रीनगर वाले- पद्मश्री

लोक संगीतकार जोयनाचरण बाथरी- पद्मश्री

शास्त्रीय गायिका के ओमानकुट्टी अम्मा- पद्मश्री

गायक महाबीर नायक – पद्मश्री

अभिनेत्री ममता शंकर -पद्मश्री

स्टंट दिग्दर्शक हसन रघू- पद्मश्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0