Kalamb ACB Trap : कळंब बाजार समितीच्या सचिवाकडून लाच घेणारा मुख्य लिपिक गजाआड
Acb Sp Sandeep Aatole
- २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा उप-निबंधक कार्यालयातील क्लार्क अँटी करप्शनच्या जाळ्यात
- पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडून लाचखोर अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात तीव्र मोहीम
कळंब, दि. २ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Kalamb ACB Trap
मुबारक जिनेरी
कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरक्षा रक्षक नियुक्तीसाठी मंजुरी आदेश देण्याकरिता ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जिल्हा उप-निबंधक कार्यालयातील लिपिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आला आहे. लिपिकाला ताब्यात घेतल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Aatole) यांच्याकडून लाचखोर अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात तीव्र मोहीम उघडण्यात आली आहे. Kalamb ACB Trap
आरोपी लोकसेवक दयानंद पांडुरंग चव्हाण, वय-45 वर्षे, पद-मुख्य लिपीक, जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव. रा. ठि. बार्शी रोड, धाराशीव मुळ पत्ता- राजे शिवाजी नगर, पाखर सांगवी, बार्शी रोड, लातुर.( वर्ग-०३) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
काल दि. १ ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव घटक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्याकडून सापळा कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदार हे कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सचिव आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी मिळणेकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे सभापती यांचे स्वाक्षरीने जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव येथे अर्ज केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी आदेश देण्याकरीता यातील आलोसे दयानंद चव्हाण याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 25,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे आनंदनगर, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदर कारवाई छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य कोणीही लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ टोल फ्री क्र:- 1064 संपर्क साधण्याचे आवाहन लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले आहे.
- पोलीस अधीक्षक संदीप आटोळे