CM Devendra Fadnavis : ‘मोदींच्या नेतृत्वात भारताच्या महानतेचा डंका विश्वात वाजतो आहे’, मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

CM Devendra Fadnavis Wishes PM Modi On Birthday : ’75 वर्षांचे तरुण म्हणून मोदी तितक्याच उमेदीने कार्यरत’; ‘2047 पर्यंत विकसित राष्ट्र’ बनवण्याच्या संकल्पात सहभागी होण्याचा निर्धार
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या भारताला ‘विकसनशील देश’ म्हणून जागतिक पातळीवर पाहिले जात होते, त्याच भारताच्या महानतेचा डंका आज विश्वात वाजतो आहे, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.
‘मोदीजींच्या विकासयात्रेत आपण सारेच यात्रेकरू’
असंख्य भुजाओं की ताकत है,….हर तरफ देश की भक्ति है!….तुम उठो, तिरंगा लहरा दो,….भारत के भाग्य को फहरा दो,…..यही समय है, सही समय है!…..भारत का अनमोल समय है!
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ज्या भारताला ‘विकसनशील देश’ म्हणून जागतिक पातळीवर काहीसं हिणवलं जात होतं, त्या भारताच्या महानतेचा डंका विश्वात वाजतो आहे. अखिल विश्वात भारताचा तिरंगा दिमाखाने फडकवणारे महान नेते आज 75 वर्षांचे तरुण म्हणून तितक्याच उमेदीनं, तडफेनं आणि जिद्दीनं कार्यमग्न आहेत.”
श्री. मोदींच्या विकासयात्रेतले आपण सारेच यात्रेकरू आहोत, असे सांगत शिंदे यांनी देशाच्या विकासाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली.
महाराष्ट्राला मागे पडू देणार नाही
पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत @2047’ या स्वप्नाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्याच्या या महान यज्ञात आपलाही सहभाग असावा, या इराद्यानंच आम्ही त्यांच्यासोबत पावलं टाकत आहोत. महाराष्ट्र कुठंही मागे पडणार नाही, याची खात्री मी देऊ शकतो.”
यावेळी शिंदे यांनी “मोदीजी आमचे नेते आहेत, याचाच आम्हा सर्वांना विलक्षण अभिमान वाटतो,” अशी भावना व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान मोदींना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो, आणि बळसागर भारताचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साक्षीने साकार होवो, अशी प्रार्थना केली.


