Jalna Crime News : प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य शिबिर राबविण्याकरिता डॉक्टरांनी मागितली लाच
•Doctors demanded bribe for conducting primary health center, health camp लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांची कारवाई ; 20 हजाराची लाच स्वीकारताना कनिष्ठ सहाय्यक आणि डॉक्टर यांना घेतले ताब्यात
जालना :- लाचलुचपन प्रतिबंधक विभागाने डॉक्टराला आणि कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. 20 हजाराची लाच Jalna Crime News स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.डॉ. शामकांत दत्तात्रय गावंडे (49 वर्ष), पंडित भीमराव कळकुंबे , (42 वर्ष) कनिष्ठ सहाय्यक यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र, वडीगोद्री व जामखेड (ता. अंबड, जि जालना ) येथे वैधकीय अधिकारी पदावर कार्यरत असून तक्रारदार यांनी त्यांच्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रा मध्ये मानव विकास अंतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिरा ची बिले पडताळणी करून मंजुरी करिता पंचायत समिती अंबड, जालना येथे पाठविण्या करिता प्रती बिल एक हजार रुपये प्रमाणे लचेची मागणी केली व सादर लाचेची रक्कम यातील कळकुंबे यांनी डॉ शामकांत गावंडे यांचे सांगणे वरून पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली. डॉक्टर आणि सहाय्यक कनिष्ठ यांना ताब्यात घेतले असून पोलिस स्टेशन, अंबड जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लाचलोचपत प्रतिबंध विभागाची कारवाई पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,राजीव तळेकर ,पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर हनुमंत वारे , पोलीस निरीक्षक ला. प्र. वि .छत्रपती संभाजीनगर, पोलीस हवालदार साईनाथ तोडकर , पोलीस नाईक युवराज हिवाळे, पोलीस अंमलदार. विलास चव्हाण यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.