Jalna ACB Action : 25 लाखांची लाच घेताना सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था दुग्ध विभागाच्या दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, छत्रपती संभाजीनगर अँटी करप्शन ब्युरोची कारवाई
•तक्रारदाराकडून 30 लाखांची लाच मागितली, तडजोडीअंत 25 लाख रक्कम ठरली. ही लाचेची रक्कमेचा पहिला हिस्सा 5 लाख रुपये घेताना सहाय्यक दुय्यम निबंधक आणि सहकार अधिकारी यांना अटक करण्यात आली.
जालना :- जालना जिल्ह्यातील दहा तालुका मंठा येथील विशाल मच्छ व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित यांच्यावरील संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्ती करण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालय जालना येथे संस्थे विरुद्ध तक्रार अर्ज दाखल झाल्याने तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जालना आणि सहकार अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 30 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम पंचवीस लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. या रकमेच्या पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना दोघा अधिकाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. संजय अर्जुनराव आराख (54 वय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जालना,) शेख रईस शेख जाफर (44 वय, सहकार अधिकारी श्रेणी-2) असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांचे विशाल मच्छ व्यवसाय सहकारी संस्था मर्या. दहा तालुका मंठा जिल्हा जालना येथील संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावरती प्रशासक नियुक्ती करण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालय जालना येथे संस्थेविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. तक्रार अर्ज निकाली काढून त्याचा निपटारा करण्यासाठी आराख व शेख यांनी तक्रारदार यांना 27 डिसेंबर 24 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालय, जालना येथे 30 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 25 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 5 लाख रुपये स्वीकारण्याचे पंचा समक्ष मान्य केले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, बाळु जाधवर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.जालना, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- शंकर म.मुटेकर पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि जालना सापळा पथक – पोलीस हवालदार गजानन खरात, अतिश तिडके, गजानन कांबळे, विठ्ठल कापसे या पथकाने लाचखोर अधिकाऱ्यांना जेरबंद केले आहे.