क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर सुमारे 5 कोटी रुपयांचे सोने जप्त, 4 तस्करांना अटक,

Mumbai Airport Seized 5 Crore Worth Gold : डीआरआयने या प्रकरणी चारही जणांना सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार अटक केली असून सोने जप्त केले आहे.

मुंबई :- मुंबई डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. Mumbai Airport Gold Sumggling News अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एजन्सीने 4 कोटी 84 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.तस्कर या सोन्याच्या धुळीचे मेणात रूपांतर करून तस्करी करत होते. यापूर्वीही हे आरोपी पकडले गेले होते.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराष्ट्र विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमध्ये काम करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांची टोळी सोन्याच्या तस्करीत सामील असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

इंटरनॅशनल ट्रान्झिट टर्मिनलमधून हे कर्मचारी तस्करांकडून छोट्या तुकड्यांमध्ये सोने गोळा करायचे आणि नंतर ते गोळा करून विमानतळाबाहेर नोयचे.तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेत असताना डीआरआयने कारवाई करत विमानतळाच्या दोन कर्मचाऱ्यांना पकडले. त्यानंतर केलेल्या कारवाईत ते सोने कोणाला देत होते, हे लक्षात येताच सोन्याचे दोन रिसीव्हरही पकडण्यात आले.

तपासणीत 5 ओव्हल कॅप्सूल आणि मेणाच्या स्वरूपात सोन्याच्या धूळाची 2 पॅकेट सापडली. तपासाअंती हे सोने 6.05 किलोचे असून या सोन्याची किंमत 4.84 कोटी रुपये असल्याचे आढळून आले.या प्रकरणी डीआरआयने चारही जणांना अटक केली असून, सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार सोने जप्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0