Jalandar Sarode : शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालंदर सरोदे ह्यांनी शिवसेनेत प्रवेश
Jalandar Sarode in Thackeray Group: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जालंदर सरोदे यांनी केला पक्षप्रवेश
मुंबई :- शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू समजले जाणारे शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे Jalandar Sarode यांनी आज (5 मार्च ) ठाकरेंच्या शिवसेनेत प्रदेश केला. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सरोदे यांनी शिवबंधन बांधले.कपिल पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नव्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली आहे. त्यांचे शिलेदार जालिंदर सरोदे यांनी साथ सोडल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. सरोदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिक्षक भावी पिढी तयार करत आहेत, पण भावी पिढी नासलेली चालणार नाही. सध्याच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज आहे. राज्यात सुराज्य आणल्याशिवाय शांत बसणार नाही.”
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
मातोश्रीवर सरोदे Jalandar Sarode यांचा पक्षप्रवेश झाला यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जालिंदर सर तुम्ही शिक्षक सेना पुरतेच काम नाही तर, शिवसेनामध्ये सुद्धा काम करणार आहात. तुम्ही शिक्षक आहात राजकारणात सुसंकृतपणा आणण्याची गरज आहे. शिक्षक म्हटल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही असं होत नाही. वेळेप्रसंगी तुम्ही छडी सुद्धा हातात घ्यावी लागेल. आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी माझ्यासोबत आला आहात. सुजाण राज्य करण्यासाठी तुमचा उपयोग करायचा आहे.तुम्ही शाळेत मेहनत करुन भावी पिढी तयार करता, भावी पिढी नासणार असेल आणि नासक्या-कुसक्या लोकांच्या हाती जाणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा फायदा काय तुम्ही योग्य वेळी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.