मुंबई
Trending

Vijay Wadettiwar : सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा हात आहे का? विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

•53 सदनिका संदर्भात बनावट कागदपत्रे बनवली, 10 कोटीच्या वर घोटाळा

मुंबई :- राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी सदनिका घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत या भ्रष्टाचार वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर जास्त आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. 53 घराचे बनावट कागदपत्र सादर करून जवळपास दहा कोटीहून अधिक पैशाचा घोटाळा झाल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. मुंबईच्या साकीनाका येथे क्रांतीनगर,बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकाच्या सदनिकाच्या चावी वाटप करण्यात शेकडो कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

  • विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
  • सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?
  • मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे का?
  • मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला आहे का?
  • मुंबईत शेकडो कोटींचा सदनिका घोटाळा;
  • घोटाळ्याची एसआटीमार्फत चौकशी व्हायला हवी!

मुंबई महानगर पालिकेतील सनदी अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. निवडणूक आयोगाने सांगून देखील या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत.
मुख्यमंत्र्यांवर या अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे का? मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला आहे का?
असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
त्यामुळे सरकारने या अधिकाऱ्यांच्या वेळीच बदल्या केल्या पाहिजेत तरच मुंबईतील निवडणुका फ्री अँण्ड फेअर वातावरणात पार पडतील .

सरकार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसल्याने आता आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाल पत्र पाठविले आहे.

मुंबईतील साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले असून यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होत असताना हा घोटाळा होतो. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी.

अश्विनी भिडे, वेलारासू हे वरिष्ठ सनदी अधिकारी देखील त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे आएएएस नसताना देखील मोठ्या पदावर आहेत. हे अधिकारी मर्जीतील असल्याने ते पक्षपातीपणा करू शकतात. हे अधिकारी निधी वाटपात दुजाभाव करू शकतात. निवडणुकीदरम्यान प्रभाव पाडून शकतात.

या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त केले पाहिजे. मुंबई महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. मुंबई साफ करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत. सरकारने याला वेळीच आळा घातला पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये.

साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. या चावी वाटपात मोठा घोटाळा झाला आहे. हे चावी वाटप करताना बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. त्यानंतर लगेच या सदनिकांची खरेदी केली गेली. यातील काही लोक युपी मधील आहेत.

या प्रकरणात 10 कोटीच्या 53 सदनिका संदर्भात बनावट कागदपत्रे बनवली गेली आहेत. हे हिमनगाचे टोक असून शेकडो कोटींचा यामध्ये घोटाळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआटीमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याला कोणाचा आशिर्वाद आहे हे समोर आले पाहिजे. अधिकारी आणि लोकप्रतिनीधींनी संगनमताने केलेला हा घोटाळा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0