मुंबई

Lalita Babar : प्रसिद्ध भारतीय धावपटू ललिता बाबर हिला पुत्ररत्न

Indian Women Racer Lalita Babar Gave Birth To Cute Boy In Motherhood Hospital : खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये दिला निरोगी बाळाला जन्म

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर (Lalita Babar) हिने खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये (Kharghar Lalita Babar) बाळाला जन्म दिला आहे. ललिता बाबर ही भारतातील सर्वात प्रसिद्ध धावपटूंपैकी एक आहे. 2016 साली रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर जागतिक स्तरावर तिने आपला वेगळाच ठसा उमटवला, जिथे तिने 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भाग घेतला. तेव्हापासून, ती आपली जिद्द आणि चिकाटीने तरुण खेळाडूंकरिता प्रेरणादायी ठरली आहे. आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये तिने भारतासाठी अनेक पदक जिंकली आहेत.

ही तिची दुसरी प्रसूती असून यापूर्वी 2019 मध्ये आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. आई आणि मूल दोघेही सुखरुप असल्याची माहिती वैद्यकिय प्रशासनाने दिली आहे. ही गोड बातमी सांगताना ललिता बाबर म्हणाल्या की माझ्या गर्भधारणेच्या संपूर्ण प्रवासात मदरहुड हॉस्पिटलमध्ये मला उत्कृष्ट सेवा आणि उपचार मिळाले याकरिता मी रुग्णालय व डॅाक्टरांच्या टिमचे आभारी आहे. माझ्या गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यावर डॉ. प्रतिमा थमके आणि संपूर्ण टीमच्या विशेष मेहनत घेतल्याचे ललिता यांनी स्पष्ट केले. Indian Women Racer Lalita Babar News

डॉ. प्रतिमा थमके (सल्लागार- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर) सांगतात की, ललिता ही उक्तम धावपटु असून गर्भधारणेच्या संपुर्ण प्रवासात तिने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत डॅाक्टरांच्या सल्ल्याचे पुरेपुर पालन केले. आई आणि मूल या दोघांचे आरोग्य उत्तम आहे अशी माहिती देखील डॉ थमके यांनी दिली. Indian Women Racer Lalita Babar News

Web Title : Indian Women Racer Lalita Babar Gave Birth To Cute Boy In Motherhood Hospital

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0