क्रीडा
Trending

India vs New Zealand LIVE : सरफराज याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले, न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा उडवला धुवा

India vs New Zealand LIVE, 1st Test, Day 4: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरू येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने शानदार शतक झळकावले.

BCCI :- बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात 46 धावांत कमी झाल्यानंतर, टीम इंडियाकडून क्वचितच कोणी पुनरागमनाची अपेक्षा केली असेल. पण, आता सरफराज खानच्या Sarfaraz Khan  शतकाने आशेची ज्योत पुन्हा पेटवली आहे.

सरफराजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून न्यूझीलंडची गोलंदाजाची झोप उडवली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताविरुद्ध 356 धावांची आघाडी घेतली होती. सरफराजच्या शतकामुळे टीम इंडिया आता किवीजच्या त्या मोठ्या आघाडीतून सावरताना दिसत आहे.

बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या तासात सर्फराजने आपले शतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 70 धावा करून नाबाद राहिला. आपल्या शतकी खेळीदरम्यान त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 163 चेंडूत 136 धावांची मोठी भागीदारीही केली.

सरफराज खानने बेंगळुरू कसोटीत 109 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने हे शतक झळकावले. सरफराज खानच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे, ज्याची स्क्रिप्ट त्याने चौथ्या कसोटी सामन्यात लिहिली आहे. याआधी त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 3 अर्धशतके आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0