महाराष्ट्र

Raj Thackeray : “मराठी अस्मितेचा एल्गार! राज ठाकरे 18 जुलैला मिरा रोडवर गरजणार

•हिंदीच्या विरोधात आंदोलनानंतर मनसेची मोठी सभा

मुंबई | राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात पेटलेल्या आंदोलनात आघाडीवर राहिलेल्या मनसेच्या आभार सभेचा आता सर्वांच्या राजकीय चर्चेत केंद्रबिंदू बनला आहे. 18 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मिरा रोड येथे जाहीर सभा घेणार असून, ही सभा केवळ आभार सभाच राहते की आगामी राजकीय दिशा दाखवणारा वळणबिंदू ठरते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

हिंदी सक्तीच्या त्रिभाषा सूत्राला विरोध करत मनसेने मुंबईत मोठं आंदोलन केलं, त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) देखील रस्त्यावर उतरला. परिणामी, राज्य सरकारला दोन्ही वादग्रस्त जीआर मागे घ्यावे लागले.या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्याला उद्धव आणि राज ठाकरे दोघांची उपस्थिती ही मोठी राजकीय घटना ठरली. त्यामुळे ठाकरे-ठाकरे युतीच्या चर्चांना उधाण आलं.

हिंदी-मराठी वादात मराठी बोलण्यास नकार दिलेल्या मिठाई विक्रेत्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला.
या मोर्चावर मनसेने जोरदार टीका करत तो “भाजप पुरस्कृत” असल्याचा आरोप केला.त्याला प्रत्युत्तर म्हणून 8 जुलै रोजी मनसेनं मिरा-भाईंदरमध्ये भव्य मोर्चा काढला, ज्याला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या पार्श्वभूमीवर आता 18 जुलै रोजी मिरा रोडवर राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. मनसेच्या वतीने ही सभा “आभार सभा” असल्याचं सांगितलं जात असलं तरी, राज ठाकरे या व्यासपीठावरून आगामी रणनिती जाहीर करतील का? यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0