IND vs AUS 5th Test :-सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजी सोमर भारतीय संघ ढेर टीम इंडिया 185 धावांवर
IND vs AUS 5th Test :- सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया 185 धावांवर ऑलआऊट झाली आहे.
IND vs AUS 5th Test :- सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला.शुक्रवारी (03 जानेवारी) सुरू झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अवघ्या 185 धावांत गारद झाली. या काळात ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताकडून पंतने 40 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाने 11 धावांच्या स्कोअरवर केएल राहुलच्या रूपाने पहिली विकेट गमावली. राहुल केवळ 04 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.त्यानंतर 17 धावांच्या स्कोअरवर यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. जैस्वालने 1 चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. त्यानंतर 57 धावांच्या स्कोअरवर शुबमन गिलच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. गिलने 2 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या सत्रात टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडून पॅव्हेलियनमध्ये परतली.रोहितच्या जागी शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. गिलला फार काही करता आले नाही तरी. त्याने 2 चौकारांच्या मदतीने केवळ 20 धावा केल्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे.ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर टीम इंडियासाठी ऋषभ पंतने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT 2024-25) मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) सुरू आहे. हा सामना 3 जानेवारीला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता चालू झाला आहे.ऑस्ट्रेलियाकडे सध्या मालिकेत 2-1 अशी आघाडी आहे आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी मोठा विजय नोंदवला होता.