पुणे

Pune Police Officer Transfer : पुणे पोलीस दलातील 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या, प्रशासनाचे कारण

Pune Police Officer Transfer Orders पुणे शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या तात्काळ बदल्या

पुणे :- लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील आचारसंहिता काल सायंकाळी उठली आहे. पुणे शहर पोलीस दलातील तब्बल 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (06 जून) रोजी दिले आहे. या बदलांमध्ये 05 सहाय्यक पोलीस आयुक्त, 05 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 09 पोलीस निरीक्षक आणि 02 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

05 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या कुठून कुठे करण्यात आले आहे

1.विठठल दिगंबर दबडे – सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-१, पुणे शहर – सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर.

2.मच्छिद्र रामचंद्र खाडे – सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर – सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर.

3.जगदिश दत्तात्रय सातव – सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर – सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर

4.रंगनाथ बापू उंडे – सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना, पुणे शहर – सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर.

5.व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे – सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर – सहायक पोलीस आयुक्त अभियान, पुणे शहर.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक / पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन असा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

अजय सुभाष चांदखेडे, सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर हे त्यांचे पदाचा कार्यभार पाहून सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना, पुणे शहर या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पहातील.

पोलीस निरीक्षक दगडू हाके यांना सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-1, पुणे शहर या पदाचा कार्यभार , विशेष शाखा, पुणे शहर व

पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-२, पुणे शहर या पदाचा कार्यभार विशेष शाखा, पुणे शहर हे त्यांचे पदाचा कार्यभार पाहून पहातील.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचा विभाग कुठे कार्यरत आहे?

संतोष उत्तमराव पाटील येरवडा पोलीस ठाणे ते विशेष शाखा

मनीषा हेमंत पाटील चंदननगर पोलीस ठाणे ते विशेष शाखा

कैलास शंकर करे – लोणीकंद पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा

विपिन व्यंकटेश हसबनीस डेक्कन पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक कल्याण

युसूफ नबिसाब शेख – उत्तम नगर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष

मीनल विलास सुपे-पाटील सायबर पोलीस ठाणे ते वाहतूक शा

गणेश रंगनाथ उगले पोलीस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष.

अर्जुन गोविंद बोत्रे – वाहतूक शाखा ते विशेष शाखा

सीमा सुधीरकुमार ढाकणे लोणीकंद पोलीस ठाणे ते विशेष शाखा

रवींद्र धैर्यशील शेळके आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलीस ठाणे

संजय गुंडाप्पा चव्हाण आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलीस ठाणे

सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर विशेष शाखा ते लोणी पोलीस ठाणे.

स्वप्नाली चंद्रकांत शिंदे नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलीस ठाणे

मोहन कृष्णा खंदारे विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते उत्तमनगर पोलीस ठाणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0