Dombivli Crime News : बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Illegal Weapon User Arrested From Dombivli Crime News : आरोपी विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोग्य कडून एक विदेशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतुसे
डोंबिवली :- देशासह राज्यात लोकसभेचे वारे वाहू लागले असल्यामुळे लोकसभेच्या तारखा जाहीर झाले त्यामुळे पोलिसांना विनापरवाला शस्त्र प्रकारे बाळगल्या प्रकरणी अनेक आरोपी अटक करण्याचे धाडसत्र चालू आहे.बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी एक आरोपीला अटक केली असून त्याच्याजवळ दोन जिवंत काडतुसे सापडली आहे. डोंबिवलीच्या मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र बाळगणे आहे.मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ व पोलीस हवालदार मासाळ व त्यांचे पथकाने, 26 मार्च 2024 रोजी दुपारी 2.20 वा.चे सुमारास, टाटा पावर, टाटा नाका, कल्याण पूर्व येथे आरोपी राम ऊर्फ शिवा फुलचंद कनोजीया, (43 वर्षे) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 1 विदेशी बनावटीचे लोखंडी पिस्टल (अग्नीशस्त्र), 2 जिवंत काडतुस असा मुद्देमाल मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ हे करीत आहेत. Dombivli Crime News