क्राईम न्यूजमुंबई

Illegale Bangladeshi Migrants: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिक अटक

Illegal Bangladeshi Migrants Arrested in Navi Mumbai: नवी मुंबई बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

नवी मुंबई :- कोपरखैरणे परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी Illegale Bangladeshi नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. Navi Mumbai Police या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने कोपरखैरणे परिसरातील एका निवासी इमारतीवर छापा टाकून चार महिला आणि एका पुरुषाला अटक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. Navi Mumbai Police Latest News

घुसखोरी प्रकरणाची माहिती देताना कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घुसखोरांच्या चौकशीदरम्यान हे सर्व बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतात घुसल्याचे आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या चार महिलांचे वय 34 ते 45 वर्षे आहे.या चारही महिला जवळच्या घरात घरकाम करत होत्या, तर 38 वर्षीय पुरुष येथे रंगकाम करायचे. पोलिसांनी सांगितले की, घुसखोरांविरुद्ध आयपीसीच्या कलमांनुसार फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तसेच पासपोर्ट भारतात प्रवेश विरुध्द कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गुन्ह पारपत्र (भारतात प्रदेश) 1950 कलम अंटसह 3(ए) व विदेशी व्यक्त्ती अधिनियम 1946 चे कलम 14(अ) सह कलम 318(4), 336(2), 338, 336 (3), 340 (2) बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कोपरखैरणे पोलीस ठाणे करत आहे. Navi Mumbai Police Latest News

अटक करण्यात आलेल्या पाच बांगलादेशीय नागरिकांची नावे

1.मायरा अस्लम मलिक, (37 वर्ष) व्यवसाय हाऊस किपींग,(चौरो गांव, कोपरखैरने, नवी मुंबई)

2) नसीमा बेगम बक्कम गाझी, (45 वर्ष), व्यवसाय हाऊस कीपिंग, (सौरना गांव, कोपरखौरने, नवी मुंबई, मुळ रा. जि. जशोर, बांगलादेश)

3) फातिमा फजल्लु खान, (44 वर्ष) व्यवसाय हाऊस कीपिंग, (रा.सौना गांव, कोपरखैरने, नवी मुंबई. मुळ रा.जि. जशोर, बांगलादेश)

4) फिरोजा शाहदत मुल्ला उर्फ फिरोजा अनीश शेख (34 वर्ष), व्यवसाय हाऊस किपीग, (सौरना गांव, कोपरखौरने, नवी मुंबई. मुळ रा.जि. जशोर, बांगलादेश)

5) अनीश असरुद्दीन शेख, (38 वर्ष) व्यवसाय पेटींग, (रा. जामा मस्जिदचे शेजारी, सेक्टर, १२, खैरना गांव, कोपरखैरने, नवी मुंबई. मुळ रा. जि. जशोर, बांगलादेश)

पोलीस पथक

पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंवई व सहाय्यक पोलीस आयुक्त AHUT गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील मॅडम, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण,पारासुर, कोलते, महिला पोलीस हवालदार घोणसेकर, महिला पोलीस नाईक अडकमोल हे सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0