Hukkah Parlour : हुक्का पार्लर कुठे सापडेल पोलीस अधिकारी मोजणार…फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Take Action On Hukkah Parlour : मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांसह महाराष्ट्रातील हुक्का पार्लरवर आता कडक कारवाई होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मोठी घोषणा केली. फडणवीस म्हणाले की, ज्या भागात हुक्का पार्लर आढळून आले. तेथील पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल
मुंबई :- राज्यात हुक्का पार्लर आणि ई-सिगारेटचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सांगितले की, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर चालत असतील, त्या पोलीस ठाण्याच्या पीआयला Police Station PI निलंबित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.2018 साली राज्यात हुक्का पार्लरवर बंदी घालण्यात आली होती, Devendra Fadnavis Take Action On Hukkah Parlour मात्र आता कायद्यात सुधारणा करून कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.दुसऱ्या गुन्ह्याच्या बाबतीत, रेस्टॉरंटचा परवाना 6 महिन्यांसाठी रद्द केला जाईल, तिसऱ्या गुन्ह्याच्या बाबतीत, परवाना कायमचा रद्द केला जाईल आणि गुन्हा अजामीनपात्र श्रेणीत टाकला जाईल.
मंगळवारी विधानसभेत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, नाना पटोले, भाजपचे आमदार संजय केळकर आणि अन्य सदस्यांनी राज्यभरात वाढणारे हुक्का पार्लर आणि ई-सिगारेटचा वाढता वापर यावर प्रश्न उपस्थित केला.पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरबाबत आमदार सुनील कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ड्रग्ज किंवा हुक्का पार्लरवर कारवाई करण्यामागचा सरकारचा हेतू पूर्णपणे स्पष्ट असून याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.