महाराष्ट्र

Thane Crime Branch News : गावठी पिस्तुलं, जिवंत काडतूस आणि सराईत गुन्हेगार!

Kalyan Crime Branch News : कल्याणमध्ये मोठा कट उधळला; गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेला आरोपी जेरबंद

कल्याण | ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch खंडणी विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत गावठी बनावटीची दोन पिस्तुलं आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. Kalyan Latest Crime News

•ठाणे क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, 25 जून रोजी संध्याकाळी ‘रोशन किराणा स्टोअर्स’जवळ सापळा रचून सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे (वय 30) या फळविक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 500 रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्तुलं आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

सचिन शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही मारहाण, जखमी करणे (भादंवि 326, 504, 34) आणि NDPS कायद्यांतर्गत अंमली पदार्थ प्रकरणी** दोन गुन्हे नोंद आहेत. आताही त्याच्यावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0