Hitendra Thakur : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वसईत भव्य स्मारक होणार ..!! आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिला शब्द
Babanrao Madne : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी आमदाराकडे (Hitendra Thakur) केली मागणी,आमदाराने दिला शब्द
वसई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Punyashlok Ahilyadevi Holkar यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त धनगर समाज चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य Dhanghar Samaj Trust यांच्या वतीने नालासोपाऱ्यात सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने Babanrao Madne यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. या कार्यक्रमात यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर Hitendra Thakur उपस्थित होते. बबनराव मदने यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे वसईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारक उभं करावे असे मागणी केली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या मागणीला दुजोरा देत लवकरात लवकर वसईत अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारक उभं करणार असे आश्वासन या कार्यक्रमानिमित्त दिले आहे. Vasai Latest News
धनगर समाज चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य नालासोपारा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सुळे यांनी नालासोपारा येथे, 299 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने, आमदार हितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष रवींद्र गरदरे, विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ,उप पोलिस निरीक्षक महानवर,माजी नगरसेवक विजय राणे, माजी सभापती अतुल साळुंखे एक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली असून सभागृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर धनगर समाज उपस्थित असून स्थानिक नेत्यांचा तसेच स्थानिक जनतेचा मोठा प्रमाणात सहभाग होता. बबनराव माने यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याकडे स्मारकासोबतच एक भव्य आणि सुशोभित उद्यान तयार करून द्यावे. त्या उद्यानाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येऊन प्रशस्त स्मारकासोबतच वाचनालय जनहितासाठी उपयोगी गोष्टी येथे करता येईल अशी मागणी मदने यांच्याकडून करण्यात आली आहे. Vasai Latest News
Web Title : Hitendra Thakur : Punyashloka Rajmata Ahilya Devi Holkar will have a grand memorial in Vasai ..!! MLA Hitendra Thakur gave the speech