मुख्य सामग्री पर जाएँ

पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

पुणे : तन्मय संदीप शेठे (वय २२, रा. नऱ्हे, पुणे, मूळ गाव जुन्नर) हा युवक पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला असताना अचानक खोल पाण्यात ओढला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेवते यांनी तातडीने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करून मदतकार्य सुरू केले. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत खोल पाण्यातून संबंधित युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय शेठे हा आपल्या मित्रपरिवारातील आठ ते दहा जणांसोबत पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान पोहत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, धरण परिसर व कालव्यांमध्ये पोहताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेयर करें