Pune News : योधी तायक्वांदो अकॅडमीच्या ५० विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान.
Pune News : पुणे- योधी तायक्वांदो अकॅडमी च्या वतीने प्रभात रस्त्यावरील डॉ.
1 मिनट पठन

Pune News : जपान आणि दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पुण्यातील खेळाडूंचे दैदीप्यमान यश.
Pune News : पुणे- योधी तायक्वांदो अकॅडमी च्या वतीने प्रभात रस्त्यावरील डॉ. शामराव कलमाडी शाळेत ब्लॅक बेल्ट वितरण आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात अकॅडमीच्या ५० विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले, तर जपान आणि दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या योधी तायक्वांदो अकॅडमी आणि भोसले तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन च्या खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक स्वप्नील दुधाने, ग्रँडमास्टर चंद्रकांत भोसले आणि गणेश वाघ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते जपान आणि दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० खेळाडूंचा 'ब्लॅक बेल्ट'ने सन्मान करण्यात आला. तायक्वांदोमधील शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अकादमीच्या ५० विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले. यामध्ये पहिला डॅन ब्लॅक बेल्ट ३८ विद्यार्थ्यांना, दुसरा डॅन ब्लॅक बेल्ट ४ विद्यार्थ्यांना आणि तिसरा डॅन ब्लॅक बेल्ट ८ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
या खेळाडूंना मास्टर राजेश पुजारी, सीनियर कोच सुवर्णा जोगळेकर, मनिषा गद्रे, स्मिता सावर्डेकर, योगेश ठीक, विजय ढेणे आणि रोहन थिटे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास योधी अकॅडमीचे अध्यक्ष नरेंद्र निकम, सचिव मास्टर राजेश पुजारी, खजिनदार केतकी पुजारी आणि सदस्य चंद्रकांत हरकुडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीया केळकर व केतकी पुजारी यांनी केले. तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन शैलजा मुल्या, चैत्रा पुजारी, किमया वर्तक, हिमेश बाहेती, हर्षिनी पुजारी आणि समायरा क्षत्रिय यांनी केले.
