Pune Crime News : उसतोड मजूर पुरवण्याच्या अमिषाने शेतकऱ्याची साडेअकरा लाखांची फसवणूक
Pune Crime News : यवत पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा
1 मिनट पठन

Pune Crime News : यवत पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा
Pune Crime News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : उसतोडणीसाठी मजूर पुरवण्याचे अमिष दाखवून एका शेतकऱ्याची तब्बल ११ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात धुळे जिल्ह्यातील दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime News
योहान शांताराम सोनवणे (रा. सुतारे, ता. साक्री, जि. धुळे), सुनील घनश्याम पवार (रा. धानेर चारणखुडी, ता. साक्री, जि. धुळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. योगेश भाऊसाहेब आवाळे (रा. नाथाचीवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. https://maharashtramirror.com/ Pune crime News
फिर्यादी योगेश आवाळे यांना उसतोडणीसाठी कामगारांची गरज होती. हीच बाब ओळखून वरिल दोघांनी १८ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादींशी संपर्क साधत त्यांना वीस उसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी योगेश आवाळे यांनी त्यांना ऑनलाईन ‘फोन पे’द्वारे तसेच प्रत्यक्ष रोख स्वरूपात वेळोवेळी ११ लाख ५७ हजार रूपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपींनी एकही उसतोड कामगार दिला नाही. रक्कम परत मागितली असता आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस हवालदार इंगवले पुढील तपास करत आहेत.
