दोन लहान मुलींसह महिला बेपत्ता
एक दिवस गावी राहून त्या दुसऱ्या दिवशी परत येणार होत्या
1 मिनट पठन

एक दिवस गावी राहून त्या दुसऱ्या दिवशी परत येणार होत्या
पिंपरी : मावळ तालुक्यातील बोरज येथून एक महिला आणि तिच्या दोन लहान मुली बेपत्ता झाल्या. ही घटना मंगळवारी (२६ मे) सकाळी साडेदहा वाजता घडली. सपना शशिकांत बेल्हेकर (२५), सृष्टी शशिकांत बेल्हेकर (३), शिवकन्या शशिकांत बेल्हेकर (२) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सपना यांचे पती शशिकांत बेल्हेकर (३४, देवले, मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत बेल्हेकर आणि त्यांच्या पत्नी सपना हे दोघे बोरज येथील ऋतुकुंज मँगो व्हिला येथे केअरटेकर म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी सपना या आपल्या गावी देवले येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाल्या. एक दिवस गावी राहून त्या दुसऱ्या दिवशी २७ मे रोजी परत बोरज येथे येणार होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन लहान मुलीदेखील होत्या. मात्र त्या दुसऱ्या दिवशी बोरज येथे आल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने २८ मे रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
