मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे परिसरातील २८ वर्षीय विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिच्या पतीसह सासू आणि दिराविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा पैसे आणि शेतासाठी मानसिक छळ केल्याचा आईचा आरोप**
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा पैसे आणि शेतासाठी मानसिक छळ केल्याचा आईचा आरोप**

Pune News : पैसे आणि शेतासाठी मानसिक छळ केल्याचा आईचा आरोप**

पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे परिसरातील २८ वर्षीय विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिच्या पतीसह सासू आणि दिराविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

याप्रकरणी विवाहितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पती विलास माधव तरगुडे (वय २९), सासू आणि दीर यांनी संगनमत करून, मनासारखे लग्न लावून दिले नाही तसेच मानपान राखला नाही, असे म्हणत विवाहितेचा अपमान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आई-वडिलांकडून पैसे आण किंवा एक एकर शेत नावावर करून दे, अशी मागणी करून विवाहितेचा मानसिक छळ करण्यात आला. या छळातून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नसून, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका निकम तपास करीत आहेत.

शेयर करें