Pune News : वारजेतील २४ मीटर डीपी रस्ता आणि नदी सुधार प्रकल्प एकाच रेषेत
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे परिसरातील मुठा नदीपात्रातून जाणारा २४ मीटर रुंदीचा विकास आराखडा (डीपी) रस्ता आणि पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प एकाच अलाइनमेंटवर येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
2 मिनट पठन

Pune News : प्रशासनाचा मोठा खुलासा
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे परिसरातील मुठा नदीपात्रातून जाणारा २४ मीटर रुंदीचा विकास आराखडा (डीपी) रस्ता आणि पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प एकाच अलाइनमेंटवर येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पीय विरोधांमुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी आणि दुहेरी कामे टाळण्यासाठी दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे राबविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले असून, महापालिका प्रशासनाने यास अधिकृत दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी शहर सुधारणा समितीकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता, ज्यावर महापालिका आयुक्तांनी सविस्तर अभिप्राय दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नदीच्या ४४.४० किलोमीटर लांबीचे काम ११ टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. यातील स्ट्रेच-६ म्हणजेच राजाराम पूल ते वडगाव (वारजे) बायपास हा टप्पा सुमारे ४.१० किमी लांबीचा असून, दोन्ही काठ धरून त्याची एकूण लांबी ८.२ किमी होते. या कामासाठी तब्बल ३६६.५७ कोटी रुपये अधिक जीएसटी व रॉयल्टी टेस्टिंग चार्जेससह ४४९.९१ कोटी रुपयांच्या पूर्वगणन पत्रकास तांत्रिक छाननी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, वारजे हद्दीमध्ये नदीपात्रात दर्शविण्यात आलेला २४ मीटरचा डीपी रस्ता आणि हा नदीकाठ सुधार प्रकल्प प्रत्यक्ष जागेवर एकाच ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
चार प्रमुख ठिकाणी थेट अतिक्रमण
प्रशासनाने पथ विभाग, मंजूर प्रकल्प आराखडे आणि डिझाइन ड्रॉइंगच्या केलेल्या संयुक्त पडताळणीमध्ये चार प्रमुख ठिकाणी डीपी रस्ता थेट नदी प्रकल्पाच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारजे पुलाजवळ सुमारे ०.४० किमी लांबीमध्ये डीपी रस्ता थेट नदी प्रकल्पाच्या हद्दीत येतो, जिथे 'रिव्हर एज डेव्हलपमेंट' प्रस्तावित आहे. वारजे एसटीपी परिसरात सुमारे ०.२० किमी लांबीमध्ये रस्ता आणि नदी प्रकल्पाच्या संरचनेत परस्पर हस्तक्षेप होत आहे. दुधाने लॉन्स परिसरामध्ये सुमारे ०.४० किमी लांबीमध्ये हा रस्ता नदी सुधार प्रकल्पाच्या विकास क्षेत्रात येत असून तिथे हरित पट्टा व सार्वजनिक सुविधा नियोजित आहेत. तर विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी परिसरात सुमारे ०.४० किमी लांबीमध्ये दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी एकाच जागेवर होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रशासनाचे स्पष्टीकरण
सदर चार ठिकाणी प्रस्तावित डीपी रस्त्याची आखणी कायम ठेवून स्वतंत्रपणे विकास केल्यास, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या मुख्य आराखड्यात मोठे मूलभूत बदल करावे लागतील, असा स्पष्ट इशारा आयुक्त कार्यालयाने दिला आहे. नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी मांडलेली वारजे हद्दीमधील २४ मीटरचा रस्ता नदीकाठ सुधार प्रकल्पासोबतच जोडण्याच्या मागणीला प्रशासकीय अभिप्रायाने पुष्टी दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या संदर्भातील सल्लागार संस्था 'मे. एच.सी.पी. डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि., अहमदाबाद' यांच्या तांत्रिक अभिप्रायानुसार, संबंधित भागातील डीपी रस्त्याचा आखणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याशी जुळवून आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. तसेच पुढील कार्यवाही करताना पथ विभागासोबत समन्वय साधून मंजूर आराखडे, पर्यावरणीय मंजुरीतील अटी, जलविज्ञान आणि हायड्रॉलिक सेफ्टी या सर्व तांत्रिक बाबींचा संयुक्तपणे विचार केला जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
हा डीपी रस्ता स्वतंत्रपणे न करता नदी सुधार प्रकल्पासोबत एकत्रितपणे अंमलात आणल्यास नदीच्या संरचनात्मक आणि पर्यावरणीय सुरक्षिततेवर होणारा प्रतिकूल परिणाम टळणार असून पुणे महानगरपालिकेचा बहुमूल्य निधी वाया जाण्यापासून वाचणार आहे.
