Pune News : वाकड-ताथवडे येथे ‘जेन अल्फा’ आणि नागरिकांचा उद्यानासाठी एल्गार
Pune News : पुणे: वाकड-ताथवडे परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता चिमुकली ‘जनरेशन अल्फा’ आणि स्थानिक नागरिक आपल्या मूलभूत नागरी हक्कासाठी एकत्र आले आहेत.
1 मिनट पठन

Pune News : ३ ऑक्टोबरला प्रत्यक्ष मैदानावर उतरणार
Pune News : पुणे: वाकड-ताथवडे परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता चिमुकली ‘जनरेशन अल्फा’ आणि स्थानिक नागरिक आपल्या मूलभूत नागरी हक्कासाठी एकत्र आले आहेत. ईऑन आयटी पार्कजवळउद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रत्यक्ष उद्यान उभारण्यात यावे, या मागणीसाठी शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेत एक शांततापूर्ण जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
वाकड आणि ताथवडे भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प आणि लोकसंख्या वाढली आहे. मात्र, या तुलनेत बालकांसाठी खेळायला आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आवश्यक असलेली मोकळी हिरवीगार जागा उपलब्ध नाही. यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
"आम्हाला उद्यान हवेच!" (We Want a Garden!) असा ठाम संदेश देत, ही मागणी कोणत्याही चैनीसाठी नसून आरोग्यदायी समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आरक्षित जागेचा विकास करून प्रशासनाने नागरिकांना हक्काची हरित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करत या अभियानाला पाठिंबा देण्याचे आणि हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना व नागरिकांना करण्यात आले आहे.
