Pimpri crime : स्टार बाजारमधील चोरीप्रकरणी सात जणांना अटक
Pimpri crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : वाकड परिसरातील स्टार बाजारमधून महागड्या खाद्यवस्तू चोरल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी चार महिला आणि तीन पुरुषांना अटक केली.
1 मिनट पठन

Pimpri crime : चार महिला, तीन पुरुष ताब्यात; इनोवा कारसह ७.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Pimpri crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : वाकड परिसरातील स्टार बाजारमधून महागड्या खाद्यवस्तू चोरल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी चार महिला आणि तीन पुरुषांना अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेले तूप, बदाम, काजू तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली इनोवा कार असा एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दत्त मंदिर परिसर आणि कलाटेवस्ती येथील स्टार बाजारमधून सुमारे ४२ हजार १०० रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार होती. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक माहिती तपासली. त्यातून संशयितांच्या इनोवा कारचा माग काढून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले.
१) रविकांत देवानंद जाकरे, (वय ३२, रा. बांद्रा प्लॉट, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), २) ब्रिजेश सिताराम मदेशिया (वय २७, रा. जोगेश्वरी (पू.) मुंबई), ३) ब्रिजेश बाळू यादव (वय ३९, रा. जोगेश्वरी (प.) मुंबई), ४) सोनम बाबू शेख (वय ३७, रा. जोगेश्वरी (पू.) मुंबई), ५) सलमा शकील शेख (वय ४९, रा. भोसरी, पुणे), ६) सानिया बाबुमिया शेख (वय २०, रा.जोगेश्वरी (पू.) मुंबई), ७) रुमा ब्रिजेश मदेशिया (वय २९, रा. जोगेश्वरी (पू.) मुंबई) अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे आरोपी सराईत गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. श्रीनिवास दराडे हे करीत आहेत.
