Wagle Estate Police Station : वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात हिंदु-मुस्लिम एकतेचे दर्शन
Wagle Estate Police Station Diwali Celebration 2024 : सीआयपीएफ, ज्येष्ठ नागरिक मुस्लिम बांधव यांच्यासोबत ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी साजरी केली दिवाळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या संकल्पनेतून साजरी झाली दिवाळी, समाजातून कौतुक!
1 मिनट पठन

Wagle Estate Police Station Diwali Celebration 2024 : सीआयपीएफ, ज्येष्ठ नागरिक मुस्लिम बांधव यांच्यासोबत ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी साजरी केली दिवाळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या संकल्पनेतून साजरी झाली दिवाळी, समाजातून कौतुक!
ठाणे :- वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात Wagle Estate Police Station प्रत्यक्षात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन अनुभवास मिळाले. Diwali Celebration वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी ठाण्यात विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election बंदोबस्ताला आलेल्या सीआयएसएफ चे अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम बांधव यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. Thane Police Latest News
तस्वीरें · 1/11
Arrow Keys ⟵ ⟶
राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पोलिसांना साप्ताहिक रजा बंद करण्यात आले आहे. विधानसभेची निवडणूक ही दिवाळीच्या दरम्यान आल्यामुळे पोलीस बांधवांना दिवाळी घरी साजरी न करता आल्यामुळे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या संकल्पनेतून शहरात विधानसभेच्या निवडणुकीच्या बंदोबस्त करिता आलेल्या सी आय एस एफ चे अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, आणि मुस्लिम बांधव यांच्यासोबत फराळ वाटप करत दिवाळी साजरी केली. पोलिसांनी फटाक्याची आतिषबाजी करत सर्वसामान्यप्रमाणेच ही दिवाळी मोठ्या जल्लोषात पोलीस ठाण्याच्या आवारात साजरी करण्यात आली आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांच्या या कार्यक्रमाला वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी जेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.पोलिसांच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले. पोलिसांनी केलेले या उपक्रमामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. Thane Police Latest News
हेही वाचा: Mumbai Police Diwali : दिवाळीच्या सुट्टीत "ऑन ड्युटी", साजरी केली अशाप्रकारे दिवाळी
