मुख्य सामग्री पर जाएँ

Delhi News : यूके सोडण्यास कायदेशीर बंदी’; फरार घोषित केल्यावर विजय मल्ल्याचा आक्षेप

Delhi news : नवी दिल्ली : देशातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून भारतातून फरार झालेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

यूके सोडण्यास कायदेशीर बंदी’; फरार घोषित केल्यावर विजय मल्ल्याचा आक्षेप
यूके सोडण्यास कायदेशीर बंदी’; फरार घोषित केल्यावर विजय मल्ल्याचा आक्षेप

Delhi News : ९,९०० कोटींच्या कर्ज प्रकरणावर सोशल मीडिया पोस्ट; ‘माझ्याबाबत अन्यायकारक भूमिका घेतली’ असा भारत सरकारवर आरोप

Delhi news : नवी दिल्ली : देशातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून भारतातून फरार झालेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्याला ‘फरार’ घोषित करण्यावर आक्षेप घेत मल्ल्याने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत. आपण १९९२ पासून युनायटेड किंगडमचे कायमस्वरूपी रहिवासी असून, सध्या यूके सोडण्यास आपल्याला कायदेशीर बंदी असल्याचा दावा त्याने केला आहे.विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे सुमारे ९,९०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याचा आरोप आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या कर्जाचा मोठा हिस्सा आहे. मार्च २०१६ मध्ये भारतातून बाहेर गेल्यानंतर मल्ल्या अद्याप भारतात परतलेला नाही. जानेवारी २०१९ मध्ये त्याला भारतात फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Delhi news

‘भारत सरकारची भूमिका अन्यायकारक’

सोशल मीडिया पोस्टमध्ये मल्ल्याने म्हटले की, “जे लोक मला भारतात परतण्यास नकार देणारा फरार व्यक्ती म्हणतात, त्यांनी हे लक्षात घ्यावे की मी १९९२ पासून यूकेचा कायमस्वरूपी रहिवासी आहे. सध्या मला कायदेशीररित्या यूके सोडण्यास बंदी आहे.” भारत सरकारने आपल्या प्रकरणात ‘पोस्टर बॉय’ बनवून अत्यंत अन्यायकारक भूमिका घेतल्याचा आरोपही त्याने केला.https://maharashtramirror.com/ Delhi news

ईडीने मालमत्ता जप्त केल्याचा दावा

मल्ल्याने पुढे ईडीच्या कारवाईचाही उल्लेख केला आहे. किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ईडीने त्याच्या जप्त केलेल्या निधीतून ३५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्याचा दावा त्याने केला. आपली मालमत्ता आणि निधी जप्त करण्यात आल्याने आपण हे पैसे देऊ शकलो नाही, असेही त्याने म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Delhi news

‘मला माझा परतावा कधी मिळणार?’

माध्यमांकडून आपल्याला सुरुवातीपासूनच ‘फसवणूक करणारा’ म्हणून संबोधले जात असल्याबद्दलही मल्ल्याने नाराजी व्यक्त केली. निष्पक्ष आणि अचूक हिशेबावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आपण शेअर केलेला तक्ता पाहावा, असे आवाहन करत “मला माझा परतावा कधी मिळणार, असा प्रश्न मी का विचारू नये?” असा सवाल त्याने केला.https://maharashtramirror.com/ Delhi news

दरम्यान, सीबीआयने विजय मल्ल्याविरुद्ध कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर तो लंडनला गेला. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्ल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्याच्याविरोधात भारतात विविध कायदेशीर कारवाया सुरू आहेत.

शेयर करें