Pune News : “…तर अमित शाहांना फोन करून न्याय मागावा लागेल” विद्यानंद बापट मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळे संतप्त
Pune News : पुणे : पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना माध्यमांशी संवाद साधत असताना मारहाण झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे : पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना माध्यमांशी संवाद साधत असताना मारहाण झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा विविध स्तरांतून निषेध होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यातील गुंडागर्दी वाढत असून, हा प्रकार तातडीने थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
“मारहाण करणे ही निषेधार्ह घटना आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक झालीच पाहिजे. तसेच त्याच्या मागे कोणती यंत्रणा किंवा ताकद काम करत आहे, याचाही तपास झाला पाहिजे,” अशी मागणी सुळे यांनी केली.https://maharashtramirror.com/ Pune News
पुण्यात अशा प्रकारच्या घटना वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याऐवजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून न्याय मागावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. माध्यमांशी शांततेने संवाद साधणे हा प्रत्येकाचा लोकशाहीतील अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे मारहाण करण्याची हिंमत कुठून येते, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Pune News
“माझा जन्म पुण्याचा आहे. पुणे हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा घटनांमुळे पुण्याची बदनामी करण्याचे षडयंत्र होत असल्याचे वाटत आहे. पुणेकरांची बदनामी होत असेल तर आम्ही न्यायालयात जाऊ,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
