Shreenager News : वंदे मातरमच्या संपूर्ण गायनावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने
shreenager News श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे.
1 मिनट पठन

Shreenager News : जम्मू-काश्मीरमधील चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सहा कडवी गायल्याने वाद
shreenager News श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वेळी ‘वंदे मातरम’ची सर्व सहा कडवी गायली गेली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख नेते सुमारे तीन मिनिटे सावधान स्थितीत उभे होते.https://maharashtramirror.com/ shreenager news
मात्र, संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायल्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वीकारल्या गेलेल्या ‘वंदे मातरम’च्या दोन कडव्यांचेच गायन व्हावे, अशी भूमिका मांडली. संपूर्ण आवृत्ती ही सलोखा आणि बहुलतावादी विचारांशी सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले.https://maharashtramirror.com/ shreenager news
काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार पलटवार केला. भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, संसदेकडून संपूर्ण ‘वंदे मातरम’च्या गायनाला मान्यता असतानाही पक्षाचा आक्षेप हा त्यांचा ‘खरा चेहरा’ दाखवणारा असल्याचे म्हटले.
विशेष म्हणजे, काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते या कार्यक्रमात संपूर्ण ‘वंदे मातरम’च्या गायनावेळी उपस्थित होते. त्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस आणि तिच्या मित्रपक्षांमध्येही मतभेद असल्याचा दावा भाजपने केला. काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना त्रिवेदी यांनी उपरोधिकपणे, ‘मुस्लिम लीग वगळता काँग्रेससोबत कोणीही नाही’, असे वक्तव्य केले.
