मुख्य सामग्री पर जाएँ

पाण्याच्या एटीएम मधून पिण्यास अयोग्य पाणी दिले जाते

पाणी खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याची कबुली; शहरात किती पिण्याच्या पाण्याचे एटीएम याचा महापालिकेला नाही थांगपत्ता

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

पाण्याच्या एटीएम मधून पिण्यास अयोग्य पाणी दिले जाते

पाणी खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याची कबुली; शहरात किती पिण्याच्या पाण्याचे एटीएम याचा महापालिकेला नाही थांगपत्ता

निलेश राऊत
पुणे:
महापालिका हद्दीत किती पिण्याच्या पाण्याचे एटीएम आहेत ज्यांद्वारे महापालिकेचे पिण्याचे पाणी दिले जाते की बोर चे पाणी उपसा करून विकले जाते, अशा पाण्याच्या एटीएम ला मनपा ने रीतसर परवानगी दिली आहे काय? याची कुठलीही माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाही.

मात्र महापालिकेचा हा भोंगळ कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. गेल्या आठवड्यात गुरुवार व शुक्रवारच्या पाणी बंद मुळे नागरिकांचे हाल होत असताना कर्वेनगर मध्ये मात्र एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. येथे एका ठिकाणी पाण्याचे एटीएम मशीन बसविण्यात आले असून अवघ्या एक रुपयात एक लिटर पाणी मिळत होते. या भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी असल्यामुळे रुपयात बिसलरी म्हंटल्यावर गर्दी होती.

या पाण्याच्या दर्ज्याबाबत व असे मनपा चे पिण्याचे पाणी किंवा बोर चे पाणी उपसा करून विकता येते कां अशी शंका आल्यामुळे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी, या भागाच्या पाणी खात्याच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांना तक्रार केली. त्यांनी त्वरित येथील पाणी तपासणीस पाठविले असता सदर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

असे असतानाही आजही म्हणजे २८ एप्रिल ( मंगळवारी) रोजी सकाळी येथे पाहणी केली असता विद्यार्थी पाणी विकत घेत असल्याचे दिसून आले. "येथे ५ रुपयात १० लिटर पाणी मिळत असून ते आम्हाला दिवसभर पिण्यास उपयुक्त असते," असे नांदेडच्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

परंतु खुद्द महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता यांनी हे पाणी पिण्या योग्य नसल्याचा अहवाल दिला असतानाही सर्रास अशा ए टी एम मधून पिण्यास अयोग्य असलेले पाणी विकले जात आहे.

एकीकडे पाण्याची कमतरता, गगनाला भिडणारे पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे भाव, महाग मिनरल वॉटर अशा वेळी या बेकायदेशीर ए टी एम मधून पिण्यास अयोग्य असलेले नाममात्र दरात पाणी विक्री करून नागरिकांची विशेषतः बाहेरून शिक्षणासाठी व नोकरीसाठी वसतिगृह येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच कामगार वर्गाच्या आरोग्याशी खेळले जात आहे.

स्मार्ट सिटी म्हणून देशात गणल्या जाणाऱ्या पुणे शहरात असे प्रकार होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यातच अशा प्रकारे पाणी विक्री होते त्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाला नसणे ही त्यावरून मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान, या निमित्ताने अश्या पद्धतीने पाणी विक्री करता येते कां ? पाणी पिण्यास अयोग्य असल्यास तेथे तसा फलक नसल्याने उद्या नागरिक आजारी पडल्यास जबाबदार कोण? शहरात अश्या प्रकारच्या पाण्याचे किती ए टी एम आहेत व यांना कोणी परवानगी दिली? असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

"पुणे शहरात पिण्याच्या पाण्याचे ए टी एम किती आहेत? त्यांना मान्यता कोणी दिली? ते पाणी पिण्यायोग्य आहे का? याची आरोग्य निरीक्षक व पाणी खात्याच्या अभियांत्यांना पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी द्यावेत व दूषित पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाची दखल घेऊन योग्य कारवाई करावी." - संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन

Unfit for drinking water is dispensed from water ATMs

शेयर करें