मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : उंड्रीत हुंड्याच्या जाचातून २३ वर्षीय महिला आयटी अभियंत्याची आत्महत्या

Pune Crime :पुणे: पुण्यातील उंड्री परिसरामध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

उंड्रीत हुंड्याच्या जाचातून २३ वर्षीय महिला आयटी अभियंत्याची आत्महत्या
उंड्रीत हुंड्याच्या जाचातून २३ वर्षीय महिला आयटी अभियंत्याची आत्महत्या

Pune Crime : पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल; लग्नात ४५ लाख खर्च केले, १० तोळे सोन्याचे दागिनेही दिले तरीही कारसाठी अतिरिक्त ५ लाखांची मागणी

Pune Crime :पुणे: पुण्यातील उंड्री परिसरामध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंड्यासाठी आणि कार खरेदीसाठी दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून २३ वर्षीय महिला आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आणि सासरच्या मंडळींवर हुंडाबंदी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी ओमकार घिसारे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती.https://maharashtramirror.com/ Pune Crime

४५ लाखांचा खर्च आणि १० तोळे सोने देऊनही छळ


मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे रोजी ओमकार संजय घिसारे याच्याशी झाला होता. मुलीच्या सुखी भविष्यासाठी वैष्णवीच्या कुटुंबीयांनी लग्नात सुमारे ४५ लाख रुपये खर्च केले होते. तसेच लग्नामध्ये १० तोळे सोन्याचे दागिनेही दिले होते.

मात्र, विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच पती ओमकार, सासरे संजय घिसारे आणि सासू यांच्याकडून अतिरिक्त ५ लाख रुपयांची मागणी सुरू झाली. नवीन कार खरेदी करण्यासाठी ही रक्कम माहेरून आणावी, यासाठी वैष्णवीवर सातत्याने दबाव टाकला जात होता.

कामाच्या निमित्ताने वैष्णवी काही काळ बंगळुरू येथे गेली होती. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस ती पुन्हा पुण्यात परतली आणि आपल्या सासरी राहून आयटी कंपनीत काम करत होती. मात्र, सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच राहिला.

मृत्यूआधी आईला फोन करून मांडली व्यथा
घटना घडली त्या रात्री, म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वैष्णवीने आपल्या आईला फोन करून सासरी होत असलेल्या त्रासाची आणि छळाची सर्व हकिकत सांगितली होती. त्यानंतर काही वेळातच, रात्री ११:३० च्या सुमारास तिच्या पतीनेही माहेरी फोन केला. या संभाषणानंतर वैष्णवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन लागू शकला नाही.

काळजीपोटी वैष्णवीचे आई-वडील तात्काळ पुण्याकडे रवाना झाले. मात्र, पुण्यात पोहोचल्यानंतर वैष्णवीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी (प्रवीण जरांडे) तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पती ओमकार घिसारे आणि त्याच्या पालकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत असून, घटनास्थळाची पाहणी व आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तपासाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें