मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्यात 'डेटिंग ॲप'वर तरुणाला लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

वारजे पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात केली कामगिरी यशस्वी

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

पुण्यात 'डेटिंग ॲप'वर तरुणाला लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

वारजे पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात केली कामगिरी यशस्वी

पुणे: मोबाईलवरील डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख करून तरुणाला बोलावून घेणे आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अवघ्या ३० मिनिटांत ताब्यात घेतले असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

गे डेटिंग अँड चॅट ॲप
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची 'गे डेटिंग अँड चॅट' (Gay Dating & Chat) या ॲपद्वारे काही व्यक्तींशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी फिर्यादीला वारजे परिसरात भेटायला बोलावले. तिथे पोहोचल्यावर आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली आणि धाक दाखवून त्याच्या मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले. तसेच, त्याच्या गळ्यातील चांदीची चेनही हिसकावून नेली.

पोलिसांची थरारक कारवाई
या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने तत्काळ वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तत्काळ तपास पथकाला तपासाचे आदेश दिले.

तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अतुलनगर चौकात सापळा रचला. पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलसांचे आवाहन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी 'डेटिंग ॲप्स'च्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका. जर कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, तर त्यांनी न घाबरता तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

कारवाई करणारे पथक आणि मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, आणि साहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, पीएसआय संजय नरळे आणि अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे, निखिल तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे सागर कुंभार आणि अमोल सुतकर यांच्या पथकाने केली आहे.

शेयर करें