मुख्य सामग्री पर जाएँ

Pune news : मोक्कातील फरार तुषार हंबीर फुरसुंगीतून अटकेत

Pune news :पुणे, महाराष्ट्र मिरर : राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई सुरू असताना फरार झालेल्या तुषार नामदेव हंबीर (वय ४०) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने फुरसुंगी प

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

मोक्कातील फरार तुषार हंबीर फुरसुंगीतून अटकेत
मोक्कातील फरार तुषार हंबीर फुरसुंगीतून अटकेत

Pune news : व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचा आरोप; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Pune news :पुणे, महाराष्ट्र मिरर : राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई सुरू असताना फरार झालेल्या तुषार नामदेव हंबीर (वय ४०) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने फुरसुंगी परिसरातून अटक केली. ही कारवाई २९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

कापूरहोळ-नारायणपूर रस्त्यावर अपहरणाचा प्रयत्न


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ नुसार संबंधित प्रकरणाची नोंद आहे. कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर गुरुकृपा मेडिकलसमोरून व्यावसायिकाचा मुलगा पृथ्वीराज हा अॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी एका कारचालकाने त्याच्या दुचाकीसमोर कार आडवी घातली. कारमधील इतर आरोपींनी पृथ्वीराज याला बळजबरीने कारमध्ये बसविल्याचा आरोप आहे. तसेच, फिर्यादी कुटुंबाला धमकावत पृथ्वीराजच्या तोंडात पिस्तुलाची नळी घालून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या घटनेदरम्यान काही आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते.

ठिकाणे आणि मोबाइल सिम बदलून पोलिसांना चकवा


या प्रकरणातील तुषार नामदेव हंबीर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार राहण्याची ठिकाणे आणि वेगवेगळ्या कंपन्यांची मोबाइल सिमकार्ड बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार, पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. आरोपी हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला २९ ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरातून ताब्यात घेतले.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल


पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार हंबीर याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, मारामारी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राजगड येथील अपहरण आणि खंडणी प्रकरणात भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि भोर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे आणि पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील व भारत मोहळ यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास भोर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें