मुख्य सामग्री पर जाएँ

Nager News : टोरंट पॉवरच्या वृक्षतोडी विरोधात नेवासेत पर्यावरण प्रेमींचा एल्गार

Nager News : नेवासा : भीमाशंकर आणि कर्जत परिसरात टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली कथित बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नेवासा तालुका वृक्ष व पर्यावरण संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

टोरंट पॉवरच्या वृक्षतोडी विरोधात नेवासेत पर्यावरण प्रेमींचा एल्गार
टोरंट पॉवरच्या वृक्षतोडी विरोधात नेवासेत पर्यावरण प्रेमींचा एल्गार

Nager News : वृक्षतोड तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाईची मागणी; तहसीलदारांना निवेदन


Nager News : नेवासा : भीमाशंकर आणि कर्जत परिसरात टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली कथित बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नेवासा तालुका वृक्ष व पर्यावरण संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले https://maharashtramirror.com/ Nager News

हजारो पशु-पक्ष्यांचा अधिवास धोक्यात; लाखो झाडांवर कुऱ्हाड?
या वेळी महेश मापारी, ॲड. संजय सुखधान, अमृत फिरोदिया, अनिल ताके, ॲड. सादिक शिलेदार आणि बालेंद्र पोतदार यांनी वृक्षतोडीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास हजारो पशु-पक्षी बेघर होतील, तसेच वन्यजीव, कीटक आणि अन्य सजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होईल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना एका खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रश्नावर ठोस भूमिका घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

३ नोव्हेंबरपर्यंत अडीच लाख झाडे तोडण्याचा दावा
टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वनविभागाकडून ६०० एकर जागा देण्यात आल्याचे सांगत, आतापर्यंत हजारो वृक्षांची तोड सुरू असल्याचा दावा आंदोलकांनी केला. तसेच, ३ नोव्हेंबरपर्यंत आणखी अडीच लाख वृक्ष तोडले जाणार असल्याची माहिती समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याबरोबरच पक्षी आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

पुनर्वनीकरणाचा अभाव आणि पर्यावरणीय समतोलाचा प्रश्न
मोठ्या प्रकल्पांसाठी यापूर्वीही लाखो झाडे तोडण्यात आली; मात्र त्यानंतर अपेक्षित वृक्षलागवड झाली नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत, अशा प्रकारच्या वृक्षतोडीमुळे भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप
स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. एका खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी सरकार इतके मेहेरबान का, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी स्थानिक जलस्रोत, वृक्षसंपदा आणि आदिवासींच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली.

वृक्षतोड तातडीने थांबवावी, संबंधित प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला.

पर्यावरणप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती
या आंदोलनात राजेंद्र काळे, संदीप आलवणे, रामभाऊ केंदळे, दीपक धनगे, दादा देशमुख, ॲड. पांडुरंग औताडे, ॲड. सोमनाथ वाकचौरे, संदीप बेळे, जयवंत मोटे, करीम सय्यद, जालिंदर गवळी, रंजन जाधव, इम्रान दारुवाला यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें