मुख्य सामग्री पर जाएँ

Pimpri News : थेरगाव येथे पानटपरी चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

Pimpri News : पिंपरी: एका पानटपरी चालकाला परिसराचा भाई असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

थेरगाव येथे पानटपरी चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा
थेरगाव येथे पानटपरी चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

Pimpri News : पिंपरी: एका पानटपरी चालकाला परिसराचा भाई असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १२ ते २२ सप्टेंबर या कालावधीत मल्हार पान शॉप धनगरबाबा मंदीर, थेरगाव येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pimpri News

राहुल कारभारी चव्हाण (३४, रा, चिंचवड) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भाऊसाहेब हरी दगडे (४०, थेरगाव, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला धमकी दिली की मी या एरियाचा भाई आहे, मला महिना १०,००० रुपये हप्ता सुरू कर, नाहीतर धंदा कसा करतो ते बघतो. तुला जीवे मारेन. अशी धमकी देऊन आरोपीने फिर्यादीकडून फोनपे व रोख स्वरूपात एकूण १,७०० रुपये जबरदस्तीने उकळले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें